विवाहित शिक्षिकेची सेलूत गळफास घेऊन आत्महत्या

सेलू,दि 17 (प्रतिनिधी)ः)
येथील आदर्शनगर मधील रहिवाशी असलेल्या रुपाली रवी रोडगे (३२) या विवाहित
शिक्षिकेने दि१६/२/२५ रविवार रोजी सकाळी राहत्या घरी बेडरूम मधील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुःखद घटना घडली आहे .
घटनेचे वृत्त समजतात पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला व दुपारी येथील उपजिल्हारुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा येथील तहसील रोडवरील स्मशानभूमीत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले .
मयत शिक्षिकेचा भाऊ रामेश्वर ज्ञानेश्वर पवार रा वझुर ता पूर्णा यांनी दिलेल्या खबरीवरून सेलू पोलिसात आ. मृ .नंबर ८/२०२५ कलम १९४ बी एन एस एस नुसार नोंद घेण्यात आली आहे .
पोलीस उपविभागीय अधिकारी टिपरसे ,पोलीस निरीक्षक दीपक बोरसे ,सपोनि प्रभाकर कवाळे ,पोउपनी पवार ,पोउपनी भाग्यश्री पुरी यांनी घटनास्थळास भेट दिली आहे .
आत्महत्येचे कारण समजले नसून या दुर्दैवी घटनेमुळे मात्र आदर्शनगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त आहे .

Comments (0)
Add Comment