प्रतिनिधी : सेलू
जगद्गुरु जगत्तज्योती महात्मा बसवेश्वर यांनीच आपल्या आचरणातून शिकवणं दिली आहे.आपण त्या आचरणाने पथक्रमण करणं म्हणजे आपले जीवन सार्थकी लागलं आहे. आपण समाजात वावरताना आपले संस्कार, आचार विचार फार महत्त्वाचे असतात. समाजातील घटकांना गृहीत धरून कामं करण्यासाठी धडपड आणि पराकाष्ठा करावी लागते.कोणतेही काम सहजासहजी करणं शक्य नसून ते सर्वागांनी परिपूर्ण असलं कि समाज मान्यता मिळते. कठीण प्रसंगातून जाताना बौद्धिक क्षमतेची कसोटी लागते ती क्षमता ज्यांच्या ठायी असते तेच काम पुर्णत्वास जातं .गणपत आप्पांनी जे जे काम समाज उपयोगी केलं त्याचं कामाचं फलित म्हणजे हा आजचा सन्मान होय.
त्यासाठी झिजावं लागतं त्याग , समर्पण भाव, दातृत्वाची जाणं ठेवून काम करणाऱ्या व्यक्तीची नोंद समाज घेत असतो. असं प्रतिपादन दिनांक २३ फेब्रुवारी रविवार रोजी शिवनाम सांगता सप्ताहात समाज भूषण गौरव पुरस्कार वितरण प्रसंगी ष.ब्र. १०८ सद्गुरू काशिनाथ महाराज पाथ्रीकर हे बोलत होते.
अध्यक्षीय समारोप करताना अशोक वाडकर म्हणाले कि समाजाच्या हिताकरीता खूप खूप कामं करता येतात.वीरशैव समाजातील व्यक्तींनी मतभिन्नता विसरून चांगल्या कामासाठी एकत्रित आलं पाहिजे. दुरदृष्टी, समाजहित, मंदिर उत्पन्नाच स्त्रोत वाढीसाठी पुढे आले तर निश्चितच स्पृहणीय आहे.
आपण आज आहोत उद्या कोणीही असणार आहे परंतु चांगले काम करत राहिल्यास समाजातील व्यक्तींनी सहकार्याची भूमिका निभावली जावी अशी अपेक्षा व्यक्त करतो.
या संपूर्ण सप्ताहात आध्यात्मिक संस्कारक्षम कार्यक्रमाचं पौरिहित्य मंदिर देवस्थानचे पुजारी कैलास स्वामी थळपती व कैलास स्वामी मिटकर यांनी केले
सप्ताहात विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते.रुद्र अभिषेक, प्रासादिक किर्तन, शिवलिला अमृत पारायण, सायंकाळी संगीत शिवकथा वेदमूर्ती विरभद्र स्वामी पिंपळगावकर त्यांना साथसंगत लिंबराज पाटील, योगेश स्वामी यांनी दिली.
यावेळी सप्ताहात अन्नदान आणि अन्य कामांसाठी योगदान देणाऱ्या सद् भक्तांचा संस्थानाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचं प्रास्ताविक पवन मिटकरी, सूत्रसंचालन संस्थानाचे सचिव प्रा.मिलिंद झमकडे, आभार ऍड शाम राऊत यांनी मानले. तर गौरव प्रमाणपत्राचं वाचन पवन स्वामी कामटे यांनी केलं.
कार्यक्रमं यशस्वी करण्यासाठी श्री.शंकरलिंग मंदिर देवस्थानचे सदस्य बालासाहेब सरकाळे,विश्वनाथ हुगे,शुभंम सोळंके,शुभंम महाजन, गणेशआप्पा केशरखाणे प्रकाश साखरे ,शुभंम नवघरे, किरण भगत, बाळासाहेब वीर, महेश शेटे, सागर महाजन, संजय झमकडे, राजेंद्रआप्पा नावाडे , दत्तात्रय मिटकर, अशोकआप्पा मसुरे, सुनील नवघरे , महेश,मिटकर, सचिन चौरे , दत्तात्रय चौरे, नागनाथ हमाणे , सोमनाथ सोळंके सर, सुशिल नाईकवाडे, बस्वराज शिवणकर, हरिभाऊ काळे, इत्यादीची उपस्थिती होती