परभणी,दि 17 ः
मानवत व परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा व जनतेचा महत्वाचा प्रश्न असलेल्या 54 गावांना पिण्याचे व सिंचनाचे पाणी उपलब्ध करून देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रधान सचिव जलसंपदा व मुख्य अभियंता लाभक्षेत्र विकास विभाग संभाजीनगर यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत, आमदार राजेश विटेकर यांचां विधानसभा सदस्य म्हणून आज अधिवेशनाचा पहिला दिवस असताना त्यांनी पाथरी विधानसभा मतदार संघातील अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या या प्रकरणी अविस्मरणीय कामगिरी केली आहे,चा
मानवत व परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांचा व जनतेचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या वरील विषयी आज आ राजेश विटेकर, आ रत्नाकरराव गुट्टे, नगराध्यक्ष डॉ अंकुशराव लाड, सभापती पंकज आंबेगावकर व इतर प्रमुख पदाधिकारी यांनी आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, व 54 गावातील जवळपास एक लाख शेतकरी, नागरिकांच्या जीवनाशी संबंधित असलेल्या या महत्वाच्या कामाची गरज विषद केली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोबत जोडलेल्या अहवालाचे बारकाईने निरीक्षण करून, ” तुमच्या आमदारकीच्या अधिवेशनाचा पहिलाच दिवस आहे, आणि पहिलेच काम जनहिताचे हाती घेवुन तुम्ही तुमच्या कार्याची योग्य सुरुवात केलेली असल्याने हे काम मंजूर होणे गरजेचे आहे” असेही सांगत थेट प्रधान सचिव जलसंपदा व मुख्य प्रशासक लाभक्षेत्र विकास विभाग संभाजीनगर यांना तत्काळ सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले,
मागील अनेक वर्षांपासून त्या परिसरातील जनतेने, शेतकऱ्यांनी व संघर्ष समितीने आंदोलने करून याप्रश्नी लढा दिलेला होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशामुळे त्याची पूर्तता होण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याने शेतकरी, नागरिक यांच्या आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे