आ.राजेश विटेकर यांच्या प्रचाराचा सोनपेठ शहरात शुभारंभ

परभणी,दिनांक 11
आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा आज सोनपेठ शहरात शुभारंभ झाला. याप्रसंगी पाथरी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘घड्याळ’ विजयी करण्याचा निर्धार सर्वांनी केला. तसेच महायुती सरकारच्या काळात घेतलेले धोरणात्मक निर्णय, झालेली लोकहिताची कामे, राबविलेल्या योजना याचाही आढावा घेण्यात आला.
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या प्रचार शुभारंभास ॲड.श्रीकांत विटेकर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड, भाजपचे ज्येष्ठ नेते रमाकांत दादा जाहगीरदार, रंगनाथ सोळंके , अमर वडकर, उस्मान बाबा खुरेशी सर्व नगरसेवक, मार्केट कमिटीचे संचालक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Comments (0)
Add Comment