सेलू / नारायण पाटील – धनलक्ष्मी बँक व बळीराजा संघर्ष समितीला शहरातील पत्रकार कसलीही अपेक्षा न करता वेळोवेळी सहकार्य करतात .त्यामुळे त्यांच्या सहकार्यातून उतराई होण्यासाठी आपण त्यांचा बँकेच्या वतीने अपघाती विमा उतरण्याचे दायित्व स्वीकारले आहे .असे प्रतिपादन माजी जी प सभापती व धनलक्ष्मी बँकेचे अशोकराव काकडे यांनी मनोगतात व्यक्त केले.
धनलक्ष्मी बँक ,व्हाईस ऑफ मीडिया व डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सेलूत आज भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत बजाज अलियाज चा पत्रकार ,बँकेतील कर्मचारी तसेच बळीराजा संघर्ष समितीच्या सदस्याचा कॅशलेस अपघाती विमा उतरण्याचा कार्यक्रम बँकेत घेतला.
यावेळी अशोकराव काकडे ,जेष्ठ पत्रकार नारायण पाटील , व्हाईस ऑफ मीडिया चे सचिव शिवाजीराव आकात ,सुधाकरराव रोकडे ,डाक विभागाचे लक्ष्मण नवघरे ,नितीन शिंदे ,मन्मय भिसे ,पवन बारडकर ,रमेश डख ,रमेश माने ,विजय भुजबळ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रास्ताविकात अशोकराव उफाडे व शंभू काकडे यांनी या कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून पत्रकारांचा अपघाती विमा उतरल्याबद्दल आभार मानले .
यावेळी बोलतांना लक्ष्मण नवघरे यांनी डाक विभागाच्या विविध विमा योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले .तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकाराला अपघातात आधार देण्याचे काम अशोकराव काकडे यांनी केल्या बद्दल कौतुक केले .लोकप्रतिनिधी पत्रकारांचा सत्कार करतात गिफ्ट देतात परंतु अपघातात अपंगत्व आल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटूंबाला आधार देण्याचे काम विमा पॉलिसी करते .व आज पत्रकार ,बँकेचे कर्मचारी तसेच बळीराजा संघर्ष समितीच्या सदस्यांचा अपघाती विमा काढून काकडे यांनी त्यांना विमाकवच मिळवून दिले आहे .
अपघातात मृत्य , कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्व आल्यास पॉलिसी धारकाला १० लाख रुपये यामध्ये मिळणार आहेत .तसेच रुग्णालयातील खर्चासाठी एकंदरीत १ लाख मिळणार असून अपंगत्व आलेल्या व्यक्तीच्या मुलांना शिक्षण खर्च साठी १ लाख मिळणार आहेत .रुग्णांच्या कुटूंबाला रुग्णवाहिकेसाठी २५,०००/- देण्यात येणार आहेत .तसेच मृत्यू आलेल्या व्यक्तीच्या कुटूंबाला लागणाऱ्या अंत्यसंस्कारासाठी ५०००/- ची देखील तरतूद या अपघात विम्यात करण्यात आली असल्याचे देखील नवघरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यावेळी धनलक्षमी बँकेच्या वतीने पत्रकार ,बँकेचे कर्मचारी तसेच बळीराजा संघर्ष समिती सदस्यांचा अपघाती विमा उतरण्यात आला.