परभणी,दि 04 ः
पाथरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार राजेश विटेकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू झाला असून आता विटेकर घराण्यातील तिसरी पिढी देखील उतरली आहे.राजेश विटेकर यांचे चिरंजीव विराज यांनी देखील आपल्या लढव्या वडिलांसाठी प्रचाराच्या मैदानात उडी घेत थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत भेटीघाटीवर भर दिला आहे.
पाथरी विधानसभा मतदारसंघावर आमदार राजेश विटेकर यांची चांगली पकड असून जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून ओळखले जाणाऱ्या विटेकर यांना ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.पाथरी,सोनपेठ मानवत व परभणी ग्रामीण या या भागात विटेकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भेटीगाठीवर भर दिला आहे. खेडोपाडी विटेकरांचे उत्स्फूर्तपणे ग्रामस्थ स्वागत करत आहेत.पाथरी मतदारसंघातील वीस वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपल्याला सेवेची संधी द्या असे आवाहन आमदार विटेकर यांच्याकडून केले जात आहे. भेटीगाठीत आमदार विटेकर हे आपुलकीने सर्वांशी सवांद साधत आहेत. ग्रामस्थ मंडळी विटेकर यांच्या सोबतच असल्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. काळजी करू नका,आम्ही सोबत आहोत, मतदार संघाला तुमची गरज आहे अशा शब्दात भावनिक साद ग्रामस्थ घालत आहेत.सिंगणापूर, पोखर्णी,दैठणा, लोहगाव, वडगाव रामपुरी या साखरपट्ट्यातील शेतकरी,तरुण यावेळी दादा आता बदल हवा असे म्हणत विटेकर यांना विजयाची हमी देत आहेत.
आमदार विटेकरांचा नेहमीच राजकारणात संघर्ष राहिला आहे,आताच्या संघर्षात विटेकरांची तिसरी पिढी देखील मैदानात उतरली आहे. विटेकरांचे चिरंजीव विराज हे देखील प्रचार यंत्रणेत सक्रिय झाले आहेत. आपल्या युवक मित्रांसह त्यांनी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.सोनपेठ शहरासह आजूबाजूच्या परिसरात जाऊन ते वडील राजेश विटेकर यांच्यासाठी प्रचारात मग्न झाले आहेत.त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असुन तरुण मोठ्या संख्येने त्यांच्यासोबत सहभागी झाले आहेत.
Every time I visit your website, I’m greeted with thought-provoking content and impeccable writing. You truly have a gift for articulating complex ideas in a clear and engaging manner.