भारतीय नागरीकाची ओळख ही आधार कार्डने होते. अर्थातच आधार कार्ड हे एक महत्वाचे दस्ताऐवज मानले जाते. म्हणूनच ऑनलाइन संबंधित युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) सेवेचा लाभ घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे. मात्र, दुसऱ्यांच्या मोबाईल क्रमांकावरून आपण आधार कार्ड लिंक करत असाल तर आताच सावध व्हा. फसवणुकीपासून वाचायचे असेल, तर जाणून घ्या या सोप्या पद्धती.
‘अशी’ टाळा फसवणूक
आपला वैयक्तिक आधार कार्डला जर इतरांचा मोबाईल नंबर लिंक केला तर ते नुकसानदायक ठरू शकते. त्यामुळे आपल्या आधारला आपला वैयक्तिक नंबर लिंक करणे आवश्यक आहे. खालील प्रकारे करा लिंक.
१. आपल्या आधार कार्डला किती मोबाईल नंबर लिंक केले आहेत याबाबत तुम्हाला माहित नसेल नाही. तर काळजी करू नका, तुम्ही दूरसंचार विभागाने जारी केलेल्या https://tafcop.dgtelecom.gov.in या पोर्टलला भेट देऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता.
२. पोर्टलवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल जो आधारशी लिंक आहे. त्यानंतर येथे तुम्हाला ‘Request OTP’ या पर्यायावर क्लिक करावे.
३. यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार, हा ओटीपी पेज वर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी कोणते मोबाईल नंबर लिंक केले आहेत ते दिसेल.
४. पोर्टलच्या स्क्रीनवर दाखविलेला नंबर खात्री करून घ्या की तो तुमचाच आहे की नाही. जर तुमचा नसेल तर तुम्ही त्याला तिथून वगळू शकता. किंवा त्याची तक्रारही करू शकता.
याप्रकारे तुम्ही आधार कार्डला तुमचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक लिंक करू शकता. यामुळे होणाऱ्या गुन्हेगारीला आळा बसू शकेल आणि तुमची कुठलीही फसवणूक होणार नाही हे निश्चित.