अभिनव नांदुर्डी शाळेत आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा

 

निफाड / रामभाऊ आवारे – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बालविकास मंदिर नांदुर्डी शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन शाळेचे प्र मुख्याध्यापक श्री शिंदे व्ही यु यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डावरे डी ए, अभिनव स्कूल कमिटी अध्यक्ष सीताराम पा ढोमसे , माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष बोराडे तात्या, उच्च माध्यमिक स्कूल कमिटी अध्यक्ष एकनाथ पा निकम यांनी प्रथम दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध प्रकारचे स्टॉल विद्यार्थ्यांनी लावलेले होते तसेच पालकांनी सुद्धा स्टॉल विविध सहभाग नोंदविला. वस्तू खरेदी विक्री व विविध ज्ञान मिळावे या हेतूने हा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. फळे भाजीपाला विविध पदार्थ यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सेल्फी पॉईंट याचाही सर्वांनी आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांनी सहकार्य केले. यात श्रीमती जाधव आर एस , श्रीमती साबळे ,ठोंबरे ए एस ,कदम एस व्ही, तुरकने व्ही एस ,घोडेकर एस आर ,निचीत जे आर, पाटील एम एस, गुरगुडे ये एम तसेच निकम डी एस, आहेर एस बी, कुशारे एस एम तसेच सर्व सेविका उपस्थित होते. पंचक्रोशीतील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment