ऍड. दत्ताञय फडतरे यांचे ऑल इंडीया बार परिक्षेत यश

पुणे – पुरंदर तालुक्यातील बोपगाव येथील अॅड .दत्ताञय फडतरे यांनी आखिल भारतीय बार परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे .नुकतेच बार कौन्सिल आॅफ इंडीया दवारे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर करण्यात आले .या निकालादवारे अॅड . फडतरे  भारतातील उच्च न्यायालयांमध्ये तसेच सर्वोच्च न्यायालयामध्ये   ते प्रॅक्टीस करण्यासाठी पाञ ठरले आहेत  . यामुळे त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.

कोणतीही मोठी पार्श्वभुमी नसताना  ग्रामीण भागातील  जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षण  ते  न्यायव्यवस्थेतील एका मानाच्या उंचीवर ते वकीली करण्यासाठी पाञ झाले आहेत .

फडतरे यांचे  पदवीपर्यंतचे शिक्षण  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाघिरे महाविद्यालय , सासवड मधुन तर  पदव्युत्तर पदवी ( मास्टर इन पाॅलिटीकल सायन्स)  शिक्षण एस.पी काॅलेज टिळक रोड ,पुणे येथुन घेतले .पुढे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री  नवलमल फिरोदिया  विधी महाविद्यालयातुन कायद्याचे  ( एलएल.बी )शिक्षण  पुर्ण केले आहे . ,ते सध्या पुणे जिल्हा आणि सञ न्यायालयात प्रॅक्टीस करत आहेत .

ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य शेतकरी कुटुबांतील शिक्षण घेत असणार्‍या मुलां-मुलींपुढे जमिनीचे वादविवाद , कौंटुबिक अडीअडचणी , आर्थिक समस्या येत ह्या असतात .परंतू  , शेतकर्‍यांच्या मुलां – मुलींनी   न खचता शिक्षणातुन  आपली एक स्वतंञ ओळख निर्माण करण्यासाठी झटले पाहीजे .त्यातुन यश मिळवत एक आदर्श उभा करणे गरजेचे असल्याचे अॅड. फडतरे यांचे म्हणणे आहे .

all indiaBar council examdattatray fadatarepass
Comments (0)
Add Comment