सेलू (नारायण पाटील )
आज दिनांक 19 सप्टेंबर मंगळवार रोजी एम आय एम पक्षाच्या परभ णी जिल्हा अध्यक्ष ॲड इम्तियाज खान यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात एम आय एम पक्षाच्या सेलू तालुका अध्यक्षपदी ॲड शेख वहीद शेख हबीब तर सेलू शहर अध्यक्षपदी पत्रकार अबरार बेग तसेच सेलू शहर उप शेख इब्राहीम शेख उस्मान यांना नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करुन आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत पूर्ण ताकतीने पक्षाचे कार्य सर्व सामान्य पोहचून पक्ष वाढविण्याचे प्रयत्न करावे अशी सूचना देण्यात आली यावेळी एम आय एम पक्षाचे परभणी शहर अध्यक्ष शेख अखिल चरण सिंह ठाकुर, शेख असलम, शेख फैझान, सह आदींची उपस्थिती होती .
या निवडीबद्दल अब्रार बेग व शेख वहीद यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .
सेलू तालुक्यात व शहरात निश्चित पक्षाचे बळ वाढवण्यासाठी भविष्यात प्रयत्न केले जातील .व आपल्यावर पक्षाच्या वरिष्ठांनी टाकलेला विश्वास नक्की सार्थकी लावला जाईल .असे यावेळी बोलताना उभयतांनी स्पष्ट केले .