मुख्यमंत्र्यांनी भावनिक होऊन निर्णय घ्यायचे नसतात, ‘या’ निर्णयावरून अजित पवारांचा सल्ला

पुणे – सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनेक निर्णयांचा धडका लागला आहे. त्यातच, गोविंदांना सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षणाची तरतूद करणार असल्याची घोषणा एकनात शिंदे यांनी जाहीर केली. यावरून सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.

याच आधारावर विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या निर्णयावर टीका केली आहे. “एखाद्या अशिक्षित गोविंदानं त्या पथकात पारितोषिक मिळवलं, तर त्याला कोणती नोकरी देणार तुम्ही? बाकीची मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करतात, त्यांना काय देणार तुम्ही?” असा सवाल अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.

 

“पोलीस, आरोग्य विभाग, शिक्षकांची भरती का करत नाहीत? तिथे तर हजारो मुलं-मुली वाट बघत आहेत. यात पूर्णपणे पारदर्शकता असायला हवी. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुला-मुलींना नोकऱ्यांची अपेक्षा आहे. पण असं असताना या कुणाचाही विचार मुख्यमंत्र्यांनी करायला नको का?” असा सवालही अजित पवारांनी केला आहे.

 

मुख्यमंत्री झाल्यानंतर भावनिक होऊन कोणताही निर्णय घ्यायचा नसतो. त्याची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू पाहायला पाहिजे. आता राज्यात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनाही ५ वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

ajit pawar & eknath shinde
Comments (0)
Add Comment