परभणी, दि. २३ :शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास,परिपाठ, शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण इतके मोठे झालो हे विसरून गेले होते. निमित्त होते सुमनताई गव्हाणे विद्यालयात इयत्ता १० वी २००४ च्या बॅच चा स्नेहमिलन सोहळ्याचे.
शहरातील सुमनताई गव्हाणे विद्यालयात इयत्ता १० वी २००४ च्या बॅच चा स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास सेवानिवृत्त मुख्याध्यापक जी.एस.मुंडे, मुख्याध्यापक के.यु.तांदळे, शिक्षक श्री.कुलकर्णी, श्री.चाटसे,श्रीमती लटपटे, श्रीमती शेप,श्रीमती घुले, श्री.केंद्रे, श्री.घुगे,श्री.कदम उपस्थित होते.या कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केली. तसेच उपस्थित सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी १० वी २००४ बॅच मधील सुरेश पुरी, दीपक गिरी, गणेश मुळे, रवी भोसले, गजानन शिंदे, विलास खुपसे, अशोक बल्लाळ, दिगंबर बहिरट, सुधाकर शिंदे, सुरज चमकुरे, शिवाजी कोठेवाड, मनोज शहाणे, हेमंत कांबळे, मोहन पवार,गजानन धूत, सचिन कांबळे, संतोष इंगळे, आमोल आगळे, अशोक वावरे, विलास कदम, संदीप पंचांगे, संदीप देशमुख, कल्याणी शेंडगे, मनीषा भालेराव, किरण जगताप, अर्चना आगळे, संगीता भाले, स्वाती वाकळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.यावेळी २००४ बॅच च्या विद्यार्थ्यांकडून शाळेस भेट स्वरुपात आठ फॅन देण्यात आले.