परभणी,दि 21 ः
महावितरणच्या वीजतारांमध्ये घर्षण होऊन पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे एक एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी दत्ता ज्ञानोबा काळे यांनी महावितरण कंपनी तसेच तहसील कार्यालयाकडे 21 ऑक्टोबर रोजी केली आहे.
महावितरणच्या गलथन कारभारामुळे धानोरा काळे येथील शेतकरी दत्ता ज्ञानोबा काळे यांचा गट क्रमांक 343 मधील एक एकर ऊस जळून खाक झाला. एक महिन्यापूर्वी महावितरण कंपनीच्या पूर्णा येथील कार्यालयाकडे विज दुरुस्त करण्याची मागणी केली होती.पररंतु महावितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केले.त्यातून आगीची घटना घडली आहे.त्यामुळे काळे यांचे लाखे रुपयांचे नुकसान झाले आहे.महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी काळे यांनी पूर्णा येथे महावितरण कंपनीसह ताललुका कृषि अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय याच्याकडे केली आहे.