सेलू, नारायण पाटील – अचानकपणे विजेच्या ताराची पार्किंग होऊन लागलेल्या आगीत माले टाकळीतील शेतकऱ्याचा एक एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना दि १९/१/२३ गुरुवार रोजी दुपारी पाच वाजता घडली.
तालुक्यातील माले टाकळी येथील शेतकरी अशोक भीमराव ताठे यांच्या गट नंबर मधील उसातील विजेच्या लोंबकळत्या ताराची अचानकपणे पार्कींग झाली व विजेचे गोळे उसात पडले .या दुर्घटनेत शेतकऱ्याचा जवळपास एक एकर ऊस जळून खाक झाला असून एक लाखाचे नुकसान झाले आहे.
सदरील घटनेचे वृत्त गावात समजताच गावातील अरुण ताठे ,श्रीहरी ताठे ,जगन खरात,किशोर ताठे ,अशोक ताठे ,जगन ढवळे ,राधाकिशन ताठे ,राहुल ताठे ,सटवाजी सोळंके ,परमेश्वर सोळंके आदी तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली .परंतु वीज पुरवठा खंडित असल्यामुळे आग विझवण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांनी आंब्याचे ,लिबाचें मोठमोठे ढा ढाकळे तोडून व जीवावर उदार होऊन सरळ उसात प्रवेश करून आग विझवली.
वीज वितरणाच्या गलथान करभारामुळेच हे नुकसान झाले .गावात देखील जागोजागी विजेच्या तारा जीर्ण होऊन लोंबकळल्या आहेत .व गावकऱ्यांना नेहमीच विज वितरणाच्या गलथान कारभाराचा त्रास सहन करावा लागतो आहे .याबाबत वेळोवेळी तक्रारी करून देखील प्रशासनाचे या कडे दुर्लक्ष होत असल्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.