सेलू ( नारायण पाटील)
देसाई फाऊंडेशन ,स्कोर से तसेच शुभंकरोती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सेलू तालुक्याती ३० शाळेतील इयत्ता ६ वी ते १० मधील जवळपास विद्यार्थिनीना मासिक पाळीतील स्वच्छता व व्यवस्थापन याबाबत तसेच प्राथमिक आरोग्य व स्वछता याबाबत जागरूकता व्हावी यासाठी नांदेड व परभणी जिल्ह्यातील शासकीय तसेच निमशासकीय शाळा मधून तसेच गावामधून मासिक पाळी स्वछता व व्यवस्थापन तसेच प्राथमिक आरोग्य व स्वछता याबाबत महिलांचे मेळावे घेऊन मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे .
या कार्यक्रमादरम्यान ६ महिन्यात जवळपास १०,००० मुली व महिलांना सविस्तरपणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे .
यामधे परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील २८ तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापुर येथील १४ शासकीय / निमशासकीय शाळांचा समावेश करण्यात येणार आहे .
यामध्ये सर्व शाळकरी मुला/ मुलींना प्राथमिक आरोग्य व स्वछता याबाबत जागरूकता केली जाणार आहे .तसेच मुली व त्यांच्या परिवारामध्ये मासिक पाळी बाबत जागरूकता निर्माण केली जात आहे .संबंधित समस्या चे निराकरण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे .या सोबतच या कार्यक्रमात देसाई फाऊंडेशन च्या सहकार्याने नांदेड येथील शुभंकरोती फाऊंडेशन मध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देशाने तयार करण्यात आलेल्या आसानी सॅनिटरी नॅपकीन चे सहा महिण्याकरिता मोफत वाटप देखील केले जाणार आहे .