परभणी,दि 05 (प्रतिनिधी)ः
परभणी तालुक्यातील सिंगणापूर येथील एका विधवा महिलेस कुटूंब अर्थसहाय्य योजनेतून आर्थिक मदत देण्यात आली. उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला.
तालुक्यातील सिंगणापूर येथील इंदुमती मारोती गिरी या महिलेच्या पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते. पती निधनानंतर कुटूंबाची संपूर्ण जबाबदारी इंदुमती गिरी यांच्यावर आली. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सदस्य वय 18 ते 59 वयोगटातील मयत व्यक्तीच्या वारसाला मदत मिळते,शासनाच्या कुटूंब अर्थसहाय्य योजनेतंर्गत देण्यात येणार्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी अर्ज केला होता. त्यांचा अर्ज तहसीलदार डॉ. संजय बिरादार यांनी मंजूर केला होता.
मंगळवारी (दि.पाच) उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, तहसीलदार डॉ. संजय बिरादार, नायब तहसीलदार कैलास वाघमारे, शितल कच्छवे, तलाठी विठ्ठल बडगुजर, मंडळाधिकारी श्री. उध्दव सरोदे,अवल कारकून श्रीमंत ललिता गौतम , लिपिक अभय पवार,माणिक गिरी, ग्रामपंचायत सदस्य परसराम खिल्लारे, शिवाजी गायकवाड, अंगद सोगे आदींची उपस्थिती होती.
ही आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अंगद सोगे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता, या अगोदर त्यांनी शासकीय योजनेतुन अनेक लाभार्थी यांना आर्थिक मदत मिळून मनधन चालू करून दिलेले आहे.