हिंगणघाटला जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट वर्धा,दि 03ः हिंगणघाटमध्ये जनावरे चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

संत कबीर वार्ड गोमाजी वार्ड व इंदिरा गांधी वार्ड येथून मागील काही दिवसापासून विविध ठिकाणावरून फिर्यादी व इतर लोकांचे १२ जनावरे चोरून नेल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाल्या त्या अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.
येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक प्रमुख शेखर डोंगरे व त्यांच्या पथकासह हिंगणघाट शहर व लगतच्या परिसरात सतत माहिती काढून अनोळखी आरोपी व जानवर यांचा शोध घेतला असता सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी १) बल्लू उर्फ शुभम मनोहर फुललेले वय 28 वर्ष राहणार बडवाईक हॉस्पिटल मागे राम बाग नागपूर २)प्रतीक राजू पंचभाई वय 19 वर्षे संत कबीर वार्ड हिंगणघाट ३) वैभव किसनाजी लेंदे वय 21 वर्षे संत कबीर वार्ड ३)वैभव कालिदास कोड संगे 21 वर्ष राहणार चांदीमारी चौक तूकूम चंद्रपूर यांना ताब्यात घेऊन त्यांना विचारपूस केली असता सदर गुन्हा कबुल केल्याची कबुली दिली त्यांचेकडून गुन्हा करण्याकरिता वापरलेली महिंद्रा कारपीओ गाडी क्रमांक एम एच चौतीस ए ए११८६ व२) मारुती स्विफ्ट डिझायर गाडी क्रमांक एम एच०४/ ८२२२ तसेच आरोपींना त्यांचे चार मोबाईल असा एकूण किंमत सात लाख 31 हजार जप्त करण्यात आला असून सर्व आरोपी पोलिस कोठडी मध्ये असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टापरे हे करीत आहे
सदर कामगिरी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळुंके,उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम,पोलीस निरीक्षक  संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोमनाथ टापरे, बांबू मुंडे, डी.बी. पथकाचे पोलीस हवालदार  शेखर डोंगरे .ना पोशि सचिन भालशंकर निलेश तेलराधें सचिन घेंवंदे विशाल बंगाले पो.शि. विजय हरनूर यांनी केली

हिंगणघाटला जनावरे चोरणारी टोळी जेरबंद
Comments (0)
Add Comment