जिजामाता बाल विद्या मंदिर येथे वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

सेलू / प्रतिनिधी – आंबेडकरनगर येथील जिजामाता बाल विद्या मंदिर येथे स्नेहसंमेलन साजरे करण्यात आले. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष पदी राजर्षि छत्रपती शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिकेत जोगदंड तर प्रमुख अतिथी म्हणून परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक श्री .संजय मगर, डॉ.ऋतुराज साडेगावकर संस्था सचिव दिगंबरराव मुळे, बाबासाहेब चारठाणकर, डॉ.गोविंद डख, तथा मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांची उपस्थिती होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व वार्षिक अहवाल मुख्याध्यापक रविंद्र पाठक यांनी सादर केला. यानंतर डी.व्हि.मुळे यांनी संस्थेच्या वाटचाली बद्दल माहिती दिली.

 

 

मुलांनी देशी खेळ खेळावेत व शक्यतो मोबाईल पासून दूर रहावे असे प्रतिपादन संजय मगर यांनी केले. याप्रसंगी डॉ.ऋतुराज साडेगावकर यांनी शुभेच्छापर भाषण केले .या कार्यक्रमात सर्व स्नेहसंमेलन अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व क्रिडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण करण्यात आले.कै. पंडितकाका देशपांडे (चारठाणकर) स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार इयत्ता चौथी व सातवी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. कै. वनमाला साडेगावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तर कै.माधवराव डख तसेच कै.विष्णुपंत व लक्ष्मीबाई यांचे स्मृती प्रित्यर्थ बक्षिसे जाहीर करण्यात आली. डॉ.अनिकेत जोगदंड यांनी अध्यक्षीय समारोपात विदयार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी अभ्यासाबरोबर क्रिडा स्पर्धेत यश संपादन करावे असे प्रतिपादन केले. या प्रसंगी आंबेडकरनगर व परिसरातील पालक मोठया प्रमाणात हजर राहून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत केला. यानंतर विद्यार्थ्यांनी बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. यावेळी पालक प्रतिनिधी यांचे स्वागत मुख्याध्यापक यांनी केले.

 

 

कार्यक्रम सूत्रसंचलन मंगेश शेळके तथा कृष्णकांत खापरखुंटीकर यांनी केले तर आभार भगवान पावडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयमाला काळे, विष्णू कटारे, सुनील राठोड, बाळू धनवे, शेख सादेखा मॅडम, तुकाराम अंभुरे यांनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment