अनुपमा जाधव यांचा जगातील पहिल्या आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये सन्मान

 

पुणे येथे भिडेवाडाकार , विजय वडेराव यांच्या वतीने देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत पहिले आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हल आयोजित करण्यात आले होते.

 

के.एल.पोंदा.हायस्कूल, डहाणू येथील उपक्रमशील, आदर्श शिक्षिका, जेष्ठ साहित्यिका, सामाजिक कार्यकर्ती, कथाकार अनुपमा जाधव यांना देखील या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी अहिराणी बोलीभाषेतून माय सावित्री ही कविता सादर केली.अहिराणी भाषेचा गोडवा,व क्रांतीज्योती सावित्रीबाईंचे कार्य ऐकून रसिकांनी भरभरुन दाद दिली.

 

यावेळी त्यांना फुले फेस्टिव्हलचे भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांच्या हस्ते सुंदर सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, भारतीय संविधान,पेन, देऊन सन्मानित करण्यात आले.अनुपमा जाधव यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

Comments (0)
Add Comment