ए पी जे अब्दुल कलाम यांचं व्यक्तिमत्व तरुणासाठी मार्गदर्शक : प्राचार्य डॉ. बबन पवार

परभणी – येथील शारदा महाविद्यालयात ग्रंथालय विभाग, मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. बबन पवार उपस्थित होते. तर यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ. श्यामसुंदर वाघमारे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. संतोष नाकाडे उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना प्राचार्य डॉ. बबन पवार म्हणाले की ए पी जे अब्दुल कलाम हे अत्यंत सामान्य परिस्थितीतून घडलेले व्यक्तिमत्व असून मच्छीमाराच्या पोटी जन्म घेऊन देशाच्या राष्ट्रपतीपदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही केवळ वाचन व कलम याच्या जोरावर केली असून त्यांचे व्यक्तिमत्व हे तरुण पिढीसाठी प्रेरणादायी असून शिक्षण, कठोर परिश्रम आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून भारताला विकसित व स्वावलंबी राष्ट्र हे साध्य केले जाऊ शकते असा त्यांचा विश्वास होता, असे मत प्रतिपादन केले.

 

यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सचिन खडके यांनी, प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रशांत मेने यांनी केले तर आभार प्रदर्शन बी. ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी करण गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. उज्वला जगताप, डॉ. नवनाथ सिंगापूरे, विश्वनाथ खेडकर, प्रकाश काळे, डॉ. श्रीधर पांढरकर,भगवान रिठाड, सुनंदा राजगुरू, तनुजा रासवे यांनी प्रयत्न केले.

Comments (0)
Add Comment