परभणी,दि 20 ः
पेडगाव येथील सतिश भगवानराव घुले हे नुकतेच प्रशिक्षण पूर्ण करून परभणी पोलिस दलात रुजु झाले आहेत. महाराष्ट्र पोलिस दलात निवड झाल्यानंतर जालना येथिल महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण केंद्रात अठरा महिन्यांचे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पुर्ण करून ते परभणी पोलीस दलात रुजु झाले आहेत. त्याबद्दल आज त्यांचा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, सुनिल कदम,हेमचंद्र शिंदे, भास्कर खटिंग, माणिक नीलवर्ण, रुखमन देशमुख,रमेश गोरे, दिपक देशमुख आदी.