मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या राज्य सचिव पदी व्यंकटेश काळे पाटील यांची नियुक्ती

परभणी,दि 21 ः
संयुक्त राष्ट्रसंघ विशेष सल्लागार समिती सलग्न असलेल्या मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सचिव पदी श्री व्यंकटेश भिमराव काळे पाटील रा. एरंडेशवर ता. पुर्णा जि. परभणी यांची नियुक्ती करण्यात आली.
मानवी हक्क संरक्षण संस्थेचे प्रदेश अध्यक्ष  राकेश आर सिंह रा. मुंबई यांनी ही निवड जाहीर केली आहे. संस्थेचे प्रदेश उपाध्यक्ष यशवंत थोरवत व राज्य मुख्य संघटक श्री अजित ढोले यांनी निवडी बद्दल विशेष अभिनंदन केले.
एरंडेशवरचे सुपुत्र श्री व्यंकटेश काळे हे मागील २५ वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रात उल्लेखनीय कार्यात आहेत… मराठा मुस्लिम आरक्षणाचा संघर्ष, शेतकर्यांचया प्रश्नावर आंदोलने , ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, कांग्रेस सेवा दलाचे प्रदेश सचिव, संविधान बचावाचे न्याय योध्दा, भारत जोडो यात्रेत भारत यात्री प्रवास, म्हणुन विविध स्तरांवर कार्य केले.
श्री काळे यांना यापूर्वी वर्धा येथे  माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते महात्मा गांधी राष्ट्रीय सन्मानित केले गेले, रिपब्लिकन न्युज वार्तांकनचा सन्मान,
छावा मराठा युवा सन्मान, राष्ट्रीय सेवा पुरस्कार अश्या विविध स्तरांवर गौरविण्यात आले आहे. विशेषता शेतकरी, कष्टकरी, आरक्षण चळवळीत त्यांचा सहभाग राहीलेला आहे. या त्यांच्या मानवतावादी कार्याची दखल घेत मानवी हक्क संरक्षण संस्थेचे प्रदेश अध्यक्ष श्री राकेश आर सिंह यांनी श्री व्यंकटेश काळेना राज्य सचिव पदावर कार्य करण्याची संधी दिली.
निवडीनंतर श्री काळे यांनी बोलताना मिळालेल्या पदाचा वापर सर्वसामान्य जनतेच्या शेवटच्या घटकांपर्यंत कार्य करेल. मानवी जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलभुत नैसर्गिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.
विशेषता महिला, शेतकरी , कष्टकरी, निराधार, अपंग, परित्यक्तया, अन्यायग्रस्त, पिडीत,दलित, अल्पसंख्याक यांच्या न्यायासाठी राज्य स्तरावरून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठपुराव्याचे काम करणार यांची ग्वाही देऊन प्रदेशाध्यक्ष श्री राकेश सिंह साहेब, प्रदेश उपाध्यक्ष श्री यशवंत थोरवत साहेब, राज्य मुख्य संघटक श्री अजित ढोले यांचे त्यांनी आभार मानले.

Comments (0)
Add Comment