सेलू / प्रतिनिधी – येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयात आज दि 19 मार्च रोजी अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्या पृथ्वीवरील यशस्वी परतीच्या प्रवासाचे प्रक्षेपण विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
या प्रसंगी मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके,मुख्याध्यापक बी यु हळणे,जेष्ठ शिक्षक संजय धारासुरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आज दि 19 मार्च रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 3 वाजून 27 मिनिटांनी भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या 9 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पृथ्वीवर यशस्वीपणे पोचल्या.ही घटना भारतीयांसाठी आणि संपूर्ण जगाला आनंद देणारी आहे.यामुळे विद्यार्थ्यांनाही याची माहिती व्हावी म्हणून आज श्री के बा विद्यालयात या प्रवासाचे प्रक्षेपण दाखवण्यात आले.
यावेळी विज्ञान शिक्षक रमेश जोशी यांनी या अंतराळातील विविध घडामोडीची माहिती दिली.गुरुत्वाकर्षण शक्ती,अंतराळात अंतराळवीर कशा पद्धतीने आपली दिनचर्या करतात.यासह पृथ्वीवर आल्यानंतर त्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याबाबत रमेश जोशी यांनी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.तसेच पृथ्वीवर हे अंतराळवीर पोचतांनाचे सर्व व्हिडीओद्वारे प्रक्षेपण देखील विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.