निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी कागदपत्रे सादर करावीत-तहसिलदार डाँ.शिवाजी मगर

सेलू:राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजने अंतर्गत लाभार्थी यांना अर्थसहाय्य वितरण माहे जानेवारी 2025 पासून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे स्तरावरुन डि.बी.टी. पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याने तालुक्यातील लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तहसिल कार्यालयात संबधित विभागात सादर करण्याचे अवाहन तहसिलदार डाँ.शिवाजी मगर यांनी केले आहे.तालूक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी यांनी आधारकार्ड, बँकेशी संलग्न मोबाईल नंबर, बँक पासबुक, सदर लाभार्थी ह्यात आहे किंवा नाही याबाबत ह्यात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इत्यादी बाबतचे आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित गावातील तलाठी किंवा संबंधित तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करावीत. तसेच आधार कार्ड अदयावत करून घ्यावे
ज्या लाभार्थी यांनी वरील कागदपत्र सादर केली नाहीत त्यांचे निवृत्ती वेतन माहे फेब्रुवारी 2025 पासून शासन स्तरावरुन अदा करण्यात येणार नाही. अशा सुचना असल्याने संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या दोन्ही योजनांचे अर्थसहाय्याचे वितरण थेट लाभार्थ्यांनी त्यांचे आधार संलग्नीकृत बाँक खात्यात (DBT) पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. लाभार्थी यांनी वरील आवश्यक ती कागदपत्रे संबंधित गावातील तलाठी किवा तहसिल कार्यालयातील संजय गांधी विभागात सादर करण्यात यावेत.