आनंद बलखंडे
आखाडा बाळापुर,दि 15ः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम जन्मोत्सव साजरा करण्यात आला .डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे सकाळी अकरा वाजता सरपंच भिमाबाई नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण बुद्ध वंदना चा कार्यक्रम संपन्न झाला निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण स. पो. निरीक्षक पी. सी .बोधनापोड यांचे हस्ते तर पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन जाधव यांच्या हस्ते संपन्न झाले।. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून काँग्रेस नेते जकी कुरेशी, पत्रकार रमेश कदम, शिवसेना युवा नेते सोपान पाटील,ग्रा.प.सदस्या शांताबाई यशवंत पंडित,आनंद बलखंडे,राहुल पंडित,यशवंत पंडित,,राजेश पंडित,भीमराव हटकर,तुषार
बोंढारे, ग्रा.प. सदस्य साईनाथ छत्रे, किरण सूर्यवंशी युवा नेते संदीप नरवाडे राजू जमदाडे ,अक्षय देशमुख आदींची उपस्थिती होती ,यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना रमेश कदम यांनी सामाजिक स्थिती व अंधश्रद्धेवर बोट ठेवत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अमलात आणण्याचे आवाहन केले .प्रमुख अतिथी नि मनोगत व्यक्त केले.या वेळी बुद्ध वंदना एन जी पंडित गुरुजी ,छायाताई पंडित,शोभाताई हटकर यांनी घेतली.
सायंकाळी चार वाजता ढोल ताशा ,नगारे ,लेझीम च्या गजरात सुशोभित अशा रथावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे भव्य मिरवणूक गावातील मुख्य रस्त्याने काढण्यात आली.जयभीम ,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष करीत हजारो बाल, तरुण,वृद्ध महिला ,पुरुष भीम अनुयायी सहभागी झाले होते .अतिशय नियोजनबद्ध सर्व कार्यक्रम संपन्न झाले .
कार्यक्रमाचे सूत्र संचलन आभार विठ्ठल पंडित यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी नियोजन भीम जन्मोत्सव समिती चे अध्यक्ष व पदाधिकारी राहुल पातोडे, अमोल पंडित,रवी ढेपे,रोहित पंडित,बाळा इंगोले,सचिन हटकर खंडू पंडित,महेंद्र पंडित,बंटी पंडित,आनंद पंडित,अविनाश पंडित,धम्म इंगोले,धीरज पंडित,शुभम कांबळे,अंकुशमोरे,राहुल पंडित,सचिन पंडित,चंद्रकांत पंडित,ज्योतिपाल पंडित,विजय हटकर,धारबा पंडित,आदींनी परिश्रम घेतले.