आज परभणीत भिमगीत संगीत रजनी, युगप्रवर्तक महोत्सव

थायलंड येथील ७० बुद्धमूर्तीचे होणार वितरण-

परभणी,दि 29 ः
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निम्मित आज दि. ३० एप्रिल २०२४ रोजी, सायंकाळी ५ वाजता विष्णु जीनिंग मैदान, अक्षदा मंगल कार्यालय समोर वसमत रोड परभणी येथे, सुप्रसिद्ध सिने महागायक आनंद शिंदे यांची भीमगीत संगीत रजनी व युगप्रवर्तक महोत्सव , थायलंड देशातील विविध आकाराच्या ७० आकर्षक बुद्धमुर्तीचे वितरण करण्यात येणार आहे.
या महोत्सवाचे आयोजन महाउपासक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे (अध्यक्ष आश्रय सेवा भावी संस्था) यांच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो (कार्याध्यक्ष अ.भा.भिक्खू संघ) पूर्णा, सिने अभिनेते डॉ.गगन मलिक (अध्यक्ष गगन मलिक फाऊंडेशन) तसेच विशेष अतिथी म्हणून दक्षिण कोरिया देशातील योंगजो मुन, बून ही किम ,किमयू हैयोन ,सू जियोंग मुन,सिनेअभिनेत्री प्लूनिसावरापिसीत्कून संडी थायलंड, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी हे भीमगीत संगीत रजनीचे ,युगप्रवर्तक महोत्सवाचे २० वे वर्ष आहे. तसेच १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती मिरवणुकीत परभणीत उत्कृष्ट व आदर्श देखावा सादर करणाऱ्या जयंती उत्सव समितीचा , प्रथम द्वितीय व तृतीय रोख बक्षिस, पारितोषिक देऊन सत्कार करण्यात येणार आहे .
भिमगीत संगीत रजनी, युगप्रवर्तक महोत्सव व बुद्धमुर्ती वितरण सोहळ्याला शहर व परिसरातील हजारोंच्या संख्येने महिला पुरुष , समाज बांधवानी राहण्याचे आवाहन मुख्य आयोजक तथा निमंत्रक डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे, (अध्यक्ष आश्रय सेवा भावी संस्था) संयोजन समितीचे भिमराव शिंगाडे, प्रा.डॉ.भिमराव खाडे, डॉ.बी. टी. धुतमल, भगवान जगताप, डॉ.प्रकाश डाके, कॉ. किर्तीकुमार बुरांडे , प्रा. डॉ. संजय जाधव , मिलिंद सावंत, अरविंद भक्ते , प्रा. राजेश रणखांबे , सुधीर कांबळे , पंकज खेडकर , प्रा.डॉ. सुनिल तूरुकमाने , मंचक ,खंदारे, दिलीप मालसमिंदर , गौतम हत्तीअंबिरे , अॅड हर्षवर्धन गायकवाड, उत्तम गायकवाड , चंद्रशेखर साळवे , प्रदीप जोंधळे , शशिकांत हत्तीअंबिरे , कपिल बनसोडे , अमोल धाडवे, भूषण कसबे , अक्षय जगताप, मकरंद बानेगावकर , अजय रसाळ , अजय वाघमारे आदिने केले

Comments (0)
Add Comment