तिंडी पिंपळगाव येथे सभा मंडपाचे भूमिपूजन

सेलू ( प्रतिनिधी )
माननीय मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या मंजुरीने माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील म तिडी पिंपळगाव येथे पर्यटन या निधीतून विविध विकास कामासाठी 50 लक्ष निधी प्राप्त झाला असून विकास कामाची भूमिपूजन नुकतेच माजी आमदार हरिभाऊ लहाने यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले
तसेच पर्यटन निधीतून उभारण्यात आलेल्या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला.
तिडी पिंपळगाव गावासाठी मा. आमदार हरिभाऊ काका लहाने यांनी निधी प्राप्त करून दिल्याबद्दल यावेळी काका चे चे मंदिर समितीने, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व गावकऱ्यातर्फे काकाचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले . यावेळी कैलासराव घुमरे ,दत्तराव जोगदंड, पिनू मालक शिवाजी कचवे शिवाजी साबळे,,शिवसेना तालुकाप्रमुख बाबा काटकर, शिवसेना शहरप्रमुख पांडुरंग कावळे, अविनाश शेरे, हनुमान गात, बालासाहेब चव्हाण, रामराव गायकवाड, गावातील प्रतिष्ठित नागरिक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments (0)
Add Comment