भूषण मोरे यांना कै. यशवंत पाथ्ये स्मृती पुरस्कार जाहीर

 

परभणी – सन 2025 चा मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईतर्फे दिला जाणारा कै.यशवंत पाथ्ये स्मृती पुरस्कार भूषण मोरे यांना पत्रकारिता क्षेत्रात भरीव आदर्श कार्यासाठी जाहीर करण्यात आला आहे.

 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ महाराष्ट्र राज्य मुंबईच्या 24 व्या वर्धापनात दिनानिमित्त पुरस्कार वितरणाचा हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे.भूषण मोरे हे मागील 24 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रांमध्ये कार्य करत असून या माध्यमातून ते जनतेची सेवा करतात सध्या ते परभणी जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे समन्वयक आहेत.सदरची निवड झाल्याचे पत्र मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ बिरवटकर यांनी पाठविले असून पुरस्कार वितरण हे दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दर्पण दिनी सायंकाळी 4 वा. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय डॉ. सुरेंद्र गावस्कर सभागृह दादर मुंबई येथे होणार आहे.या निवडीने भूषण मोरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Comments (0)
Add Comment