परभणीमध्ये शिक्षकांचा विराट महा आक्रोश मोर्चा

परभणी,दि 25 ः
शाळा आणि शिक्षणाच्या संदर्भात शासनाने योग्य निर्णयांची अंमलबजावणी करावी, याकरिता परभणीमध्ये सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने बुधवार दि.२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर  विराट महा आक्रोश मोर्चा  काढण्यात आला.

शासनाने शाळेतील विद्यार्थी संख्येच्या अनुषंगाने शिक्षकांची अट पूर्ववत ठेवावी. द्वि शिक्षक ही शाळेमध्ये एक शिक्षक कमी करून कंत्राटी शिक्षक भरती करू नये, १ नोव्हेंबर २००५ पासून शिक्षक सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, ऑनलाइनची कामे नकोत, शालेय पोषण आहार विशेष यंत्रणेमार्फत द्यावा, विशेष निवड श्रेणी सर्व शिक्षकांना देण्यात यावी, शिक्षकांना शिकवू द्यावे आणि विद्यार्थ्यांना शिकू द्यावे, अशा प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या शासनाने गांभीर्याने दखल घेऊन मान्य कराव्यात, याकरिता या महा आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
पाऊस असतानाही जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने शिक्षक आणि शिक्षिकांची प्रचंड उपस्थिती या मोर्चामध्ये दिसून आली.
अत्यंत शांततेत आणि शिस्तीमध्ये हा मोर्चा शनिवार बाजार मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.यावेळी अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.शिक्षकांच्या मोर्चाच्या सभेचे सूत्रसंचालन शिरीष लोहट यांनी केले. तर आभार प्रदर्शन अरुण चव्हाळ यांनी व्यक्त केले.

Comments (0)
Add Comment