आ.राजेश विटेकरांवर मोठी जबाबदारी.. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

कैलास चव्हाण
परभणी,दि 28 ः
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार राजेश विटेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थित आमदार विटेकर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

मागील वर्षभरापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे परभणी जिल्ह्यातील नेतृत्व राजेश विटेकर यांच्याकडे आले आहे,सुरुवातीला विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष पद देखील त्यांच्याकडेच येईल अशी शक्यता वर्तवली जात होती त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार विटेकर हे निवडून आले. यावेळी जिल्हा कार्यकारणीत देखील फेरबदल होऊन विटेकर यांना नेतृत्व दिले जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात होती, त्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवर हालचाली देखील सुरू होत्या. ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद देऊन विटेकर यांच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यात राष्ट्रवादीला बळकट करायचे या हेतूने आमदार विटेकर यांना पक्षश्रेष्ठींनी मोठी जबाबदारी दिली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. आमदार विटेकर यांची ग्रामीण भागावर मोठी पकड आहे, जिल्हा परिषदेमध्ये सातत्याने ते सत्तेत राहीले आहेत, त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती यासह अन्य निवडणुकांमध्ये विटेकर यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने परभणी जिल्ह्यात आमदार विटेकर यांना बळ देण्यासाठी ग्रामीण जिल्हाध्यक्ष पद देऊन मोठी संधी दिली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले.प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या स्वाक्षरीने ही निवड करण्यात आली यावेळी महानगराध्यक्ष प्रताप देशमुख हे देखील उपस्थित होते.या निवडीचे परभणी जिल्ह्यामध्ये स्वागत करण्यात येत आहे.

 

Comments (0)
Add Comment