भाजपाकडून डॉ.केदार खटिंग यांच्यावर मोठी जबाबदारी

परभणी
विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने आपले विधानसभा निहाय समन्वयक जाहीर केले आहेत. यामध्ये भाजप कडून परभणी विधानसभा समन्वयक म्हणून डॉ. केदार खटिंग यांची वर्णी लागली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षाने तयारी केली आहे महायुतीने देखील निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. महायुतीच्या वतीने भाजपा राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गट यांनी एकत्रित विधानसभेचे आपले समन्वयक जाहीर केले आहेत. यामध्ये परभणीत विधानसभेसाठी भाजपकडून डॉ. केदार खटिंग यांची निवड करण्यात आली आहे.डॉ.खटिंग  यांनी यापुर्वी लोकसभा निवडणुकीत सहसमनव्यक म्हणून काम केले आहे.लोकसभा निवडणुकीत महायुतीतील सर्व घटकपक्षांसोबत त्यांनी समनव्य साधत निवडणुक यंत्रणा हाताळली होती.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघ चालक म्हणून डॉ.खटिंग यांचे कार्य संपूर्ण जिल्ह्याने पाहीले आहे.आता भाजपात प्रवेश केल्यानंतर डॉ.खटिंग हे चांगले सक्रिय झाले आहेत.लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदववार म्हणून डॉ.खटिंग यांच्या नावाची चर्चा होती.परंतु ऐनवेळेला हा मतदार संघ रासपाला देण्यात आला.आता विधानसभा निवडणुकीच्या निमीत्ताने भाजपाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकत पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहेत.स्वच्छ प्रतिमा,जिल्ह्यात असलेले मित्रपरिवाराचे जाळे,उच्चशिक्षीत,वैद्यकीय क्षेत्रात नावाजलेले व्यक्तीमत्व म्हणून डॉ.खटिंग यांची वेगळी ओळख आहे.विधानसभा निवडणुकीत डॉ.खटिंग यांच्या वलयाचा महायुतीला निश्चीत लाभ होणार आहे.

Comments (0)
Add Comment