परभणी,दि 04 ः
भारतीय जनता पार्टीच्या विधानसभा गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या परभणीतील नेतेमंडळींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणुक समनव्यक डॉ.केदार खटिंग यांच्या नेतृवात बुधवारी (दि.04) परभणीत फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत एकमेकांना पेढे भरवुन आनंदोत्सव साजरा केला.
मध्यवस्तीतील गव्हाणे चौकात भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ. केदार खटींग,बाळासाहेब भालेराव,माजी नगरसेवक मधुकर गव्हाणे, माजी नगरसेवक राजेश देशपांडे, प्रशांत पार्डीकर, अतिख पटेल, प्रदेश कार्यकारणी सदस्य मोहन कुलकर्णी, अब्दुल बारी, मनोज डावरे, अॅड. गणेश जाधव, अनुप शिरडकर, दिनेश नरवाडकर, प्रभावती अन्नपूर्णे, अनंता गिरी, संजय रिझवानी, रितेश जैन यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्राला सर्वच बाबतीत संपन्न करेल हा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल डॉ.खटिंग यांनी सर्व जनतेचे आभार देखील मानले.