सेलू,दि 10 ः
व्यासांच्या लेखणीतून व शुकाचाऱ्याच्या मुखातून आपल्याला मिळालेल्या भागवत कथेच्या श्रवणाने आपल्यातील ज्ञान व वैराग्य बलवान होते .कोणत्याही वैदिक विधीतील कमतरता व दोष निवारण करण्यासाठी भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते .असे प्रतिपादन भागवताचार्य विलास महाराज जिल्हारे ( नागपूर ) यांनी भागवत कथेच्या प्रथम दिनी निरुपणात केले .
येथील प्रसिद्ध विधिज्ञ ऍड अशोकराव फोफसे यांनी या भागवत कथेचे आयोजन केले असून भागताचार्य विलास महाराज जिल्हारे ( नागपूर ) यांच्या सुश्राव्य , अमृततुल्य व रसाळ वाणीतून दररोज दुपारी १२ ते ४ यावेळेत कथानिरुपन होत आहे . प्रारंभ आज दि ९ रोजी ग्रँथ मिरवणूक व कुलजीत अशोकराव फोफसे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत पूजनाने झाला .
यावेळी कथा निरुपणात जिल्हारे महाराज पुढे म्हणाले की ,त्रिकालाबाधित सत्य हेच परमात्म्याचे स्वरूप असून ज्ञानाचे दुसरे मूर्तिमंत रूप म्हणजे साक्षात परमेश्वर आहे .व त्याचेच नावं श्रीकृष्ण आहे .परमात्मा ज्ञानस्वरूप व आनंदस्वरूप आहे .भागवत कथेच्या श्रवणाने भक्ती ,ज्ञान व वैराग्याचा उदय होऊन विवेकाची वृद्धी होते .मोह हेच मानवाच्या दुःखाचे मुख्य कारण आहे .व अर्जुनाचा हा मोह दूर करण्यासाठीच भगवंताने केलेला उपदेश म्हणजेच भगवत गीता आहे .भक्तीमुळे जीवनाची त्रिविध तापातून मुक्ती होते .व त्यासाठी भागवत कथा श्रवण हा एकमेव मार्ग आहे .कारण साधनेमुळे आपण कळत नकळत केलेल्या पापाची तीव्रता कमी होऊन त्याचे क्षालन होते .असेही यावेळी विलास महाराज जिल्हारे यांनी सांगितले .यावेळी संगीत व गायनाची सुंदर साथ रमेश बिटे व विष्णू घोळमे यांनी दिली .यावेळी अभिजित अशोकराव फोफसे यांनी सपत्नीक ग्रँथाची आरती केली .