त्याला आधी हाकला..जितेंद्र आव्हाडांची मोठी मागणी..

: संतोष देशमुख  हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. बीडमधील या सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये संतोष देशमुख यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले. लवकरात लवकर मुख्य आरोपीला अटक करण्याची मागणी केली.धनजंय मुंडे मंत्रिमंडळात बसून डोळे दाखवतो त्याला आधी हाकला तरच चौकशी होईल , अशी मागणी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच आकाचा बाप कोण आहे? हे सगळ्यांना माहित आहे त्याच नाव घ्या, असेही आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, पुसलेलं कुंकू परत कोण आणणार तरी आपण राजकारण करतोय. नेता कितीही मोठा असू दे तुम्ही कायम एकी ठेवा. योग्य कारवाई झाली नाही तर बीडला आग लागल्याशिवाय राहणार नाही. अटक आरोपींची नार्को टेस्ट करा आणि दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. मंत्रिमंडळात हा बसणार आणि डोळे दाखवणार… कसली चौकशी होणार.. त्यापेक्षा संतोष देशमुखांची चौकशी करू नका. अपेक्षाभंग करू नका.

वाल्मिक कराडचा वाल्या झालाय : आव्हाड

जितेंद्र आव्हाड म्हणाले, बीडच्या राजकारणाला कधी जातीचा स्पर्श झाला नाही. बीडचा सत्यानाशा पोलिस प्रशासनाने आणि पालकमंत्र्यांने केला आहे. वाल्मिक कराडचा वाल्या झाला आहे. बीडमध्ये अनेक वंजारी समाजाच्या अनेकांच्या हत्या झाल्या आहेत. बीडमध्ये एकही अधिकारी धनंजय मुंडेंना विचारल्याशिवाय आणला जात नाही. अॅट्रॉसिटी दाखल केली असती तरीआज संतोषची हत्या झाली नसती.

 

आव्हाडांचा मोठा गौफ्यस्फोट

भाषण करताना जितेंद्र आव्हाड यांनी एक गौप्यस्फोट केला. त्यांनी पोक्षे नावाच्या एका अधिकाऱ्याच्या मुलाखतीचा यावेळी दाखला दिला. त्या अधिकाऱ्याने दिलेली माहिती त्यांनी सांगितली. बीडमध्ये असताना तिथे नेहमी मारामारी व्हायची. दर दोन दिवसाने मारामारी होत होती. पण एका कलेक्टरची बदली झाली. तो कलेक्टर पुन्हा दिसला नाही. खरं काय माहीत नाही. पण या अधिकार्‍याकडून माहिती घ्या. त्यांच्या तोंडातून सत्य बाहेर येऊ द्या, असे आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी केले. एक कलेक्टर इथून गायब झाले ते परत कधीच दिसले नाही. याची शासन दरबारी काहीच नोंद नाही, असा आरोप पण त्यांनी केला.

Comments (0)
Add Comment