आज प्रा.शा. उमरा येथे गावचे सुपूत्र तथा सध्या मुबंई येथे वास्तव्यास असणारे युवा उद्योजक नितीन कदम यांचा मुलगा शिवांश याचा 5 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.शिवांश च्या वाढदिवसानिमित्त नितीनराव कदम यांच्या तर्फे यांनी 150 टाय, व 150 पेन व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले.
यावेळी जय किसान माध्यमिक विद्यालय उमरा शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव , व्य. स. अध्यक्ष सुरेशराव कोल्हे, शा. व्य. स. सदस्य किशनराव कोल्हे, शाळेचे मुख्याध्यापक आसाराम गाढवे , श्री. गायकवाड , श्री. वायभासे ,दिपक कोल्हे व ग्रामस्थ उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. नितीनराव कोल्हे यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपल्या आई – वडिल यांच्या परिस्थितिची जाणीव ठेवून त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच गुरुजनांचा व वडीलधाऱ्या व्यक्तिंचा सन्मान करावा अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरुन बोलताना जय किसान माध्य. शाळेचे मुख्याध्यापक श्री. जाधव सरांनी सध्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, व परिश्रम या तिसुत्रीचा अवलंब करून जिवनात यशस्वी व्हावे असा कानमंत्र दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. वायभासे बी.ए. यांनी केले व गावातील लहान मुलांपासून ते तरुण व गावातील नेते मंडळी यांनी सुद्धा वाढदिवसाच्या कार्यक्रमाला फाटा देत वाढदिवस शाळेत साजरे करून तो खर्च शाळेतील विद्यार्थ्यांच्या शै. गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा असे आवाहन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विनायक गायकवाड यांनी केले.