गंगाखेड: व्हाईस ऑफ मिडिया गंगाखेड शाखेच्या वतीने सोमवार ६ जानेवारी रोजी दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पत्रकारांच्या विमा कवच वाटपाचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करून दर्पण दिन साजरा करण्यात आला.
शहरातील शासकीय विश्रामगृहात व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने आयोजीत दर्पण दिन कार्यक्रमाची सुरुवात झारखंड येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्रकार यांना श्रद्धांजली अर्पण करून दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेच्या पुजनाने करण्यात आली. जेष्ठ पत्रकार दगडू सोमाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी झारखंड येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्रकार यांना श्रद्धांजली अर्पण करून दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनानंतर व्हाईस ऑफ मिडिया शाखेच्या पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पंधरा लाख रुपयांच्या विमा कवचचा मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. रविवार १९ जानेवारी रोजी गंगाखेड शहरात आयोजीत दर्पण दिन सोहळ्याची माहिती पत्रकारांना देऊन सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष अन्वर शेख लिंबेकर यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा व्यापारी दगडू सोमाणी यांच्याकडून उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना टॉवेल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.