फेक कॉल करून १७३८०९८ रुपयांची केली फसवणूक

 

सेलू / नारायण पाटील – एक फेक कॉल करून १७३८०९८ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला असून सदरील फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात सेलू पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करीत आहेत .

 

दि 20/08/2024 चे दुपारी 15.30 वा सु ते दि 23/08/2024 चे दुपारी 15.00 वा चे दरम्यान येथील पारीख कॉलनी मधील प्रतीक नंदलाल कुंदनांनी यांना अज्ञात आरोपीने फेक कॉल करून तुमचे पार्सल इरान येथिल सिमा शुल्क विभागाने पकडलेल असुन आपण मुंबई क्राइम ब्रँच कडे तक्रार करा असे म्हणुन ऑनलाइन कॉल जोडुन दिला व सदर कॉलवर हिंदी भाषेमध्ये मी मुंबई क्राइम ब्रँच मधुन बोलतो आपण मनी लाँड्रीगच्या वेगवेगळ्या राज्यातील प्रणालीशी जोडलेले आहात आपल्या विरुध्द निघालेले वारंट तुर्त स्थगित ठेवण्यात आलेली आहे असे म्हणुन फिर्यादीचे आधारकार्ड घेवुन त्याचे नेटबँकिंग लॉगीन करायला लावुन तसेच त्याचे नावे असलेली मुदत ठेव (एफडी) तोडण्यास लावली व सर्व रक्कम फिर्यादीच्या खात्यात जमा झाल्या नंतर बँकेतील कर्मचारी फिर्यादीची खात्यातील माहीती लिक करतील आम्ही पोलीस आहोत तुम्हाला काही होणार नाही असे विश्वासाने भासवुन फिर्यादीस वेगवेगळ्या खात्यात युपीआय, IMPS, चेक याव्दारे एकुण 1738098/- रू अन्यायाने विश्वासघात करून फसवनुक केली आहे . अशी फिर्याद प्रतीक नंदलाल कुंदनांनी यांनी सेलू पोलिसात दिल्यावरून २९/८/२४ रोजी अज्ञात आरोपीच्या विरोधात कलम ३१८(४)भा न्या से २०२३ नुसार गुन्हा दाखल करून मा पोनी बोरसे साहेबांच्या आदेशान्वये तपासकामी पोउपनी सावंत यांचेकडे देण्यात आला आहे .

Comments (0)
Add Comment