मुंबई,दि 06 ः
सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती आणल्यामुळे महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत गेल्या तीन वर्षांपासून अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यासंदर्भातही देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत भाष्य केलं. “एका दृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं चुकीचं आहे. सर्वोच्च न्यायालयात ते प्रकरण अडकलं आहे. आमचा पूर्ण प्रयत्न आहे. मी कालच सरकारी वकिलांशी बोललो की त्याची सुनावणी लवकर घ्यावी यासाठी अर्ज करा आणि न्यायालयाला विनंती करा की याबाबतची स्थगिती हटवा. आमचा प्रयत्न असेल की लवकरात लवकर या निवडणुका झाल्या पाहिजेत”, असं ते म्हणाले.
राज ठाकरेंनी केलं अभिनंदन!
दरम्यान, शपथविधी झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. “२०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो”, असं या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी म्हटलं आहे.दरम्यान, या सर्व घडामोडी चालू असताना राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सूचक भाष्य केलं आहे.
फडणवीस राज ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले?
“मुळात लोकसभेत राज ठाकरे यांनी खुल्या दिलाने पाठिंबा दिला. आम्हाला फायदा झाला. त्यांचा पक्ष आहे. त्यांनी निवडणुका लढल्या नाही तर पक्ष चालणार कसा. आमच्याकडे जागाच नव्हत्या. तीन पक्ष होतो. त्यामुळे ते स्वतंत्र लढले. त्यांना मते चांगले मिळाले. त्यांचे आणि आमचे विचार जुळतात. त्यांना आमच्यासोबत ठेवण्यात आम्हाला रस आहे. महापालिका निवडणुकीत जिथे शक्य आहे तिथे त्यांच्याशी युती करू”, असं मोठं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं