मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा व्हायला सूरूवात झाली आहे. अनेक महिलांच्या खात्यात दोन दिवसापासून दोन महिण्याचे मिळुन 3 हजार तर कुणाच्या एकत्रीत 7500 जमा झाले आहेत. तर काही महिलांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीयेत. त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय की बँकेत तिसरा हप्ता जमा होणार की नाही? असे असताना आम्ही आता योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही, हे कसे तपासायचे? हे जाणून घेऊयात
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हा काही निकष ठरवण्यात आले होते. त्यानुसार, अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेत पात्र ठरवण्यात येणार, बँकेशी आधार लिंक असणं गरजेचं आहे, महिलेच्या कुटुंबातील कोणाकडेही चार चाकी गाडी नसावी आदी काही निकष होते. त्यामध्ये बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक असणं फार गरजेचं आहे. कारण, तुमचा अर्ज स्वीकारला गेला असला तरीही बँक सिडिंग नसल्याने तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येणार आहेत. तसंच, एकापेक्षा अधिक बँक खाती असतील आणि अधिक खात्यांपैकी कोणतंही खातं सिडिंग झालं असेल तर त्या खात्यातही थेट पैसे जमा होत आहेत. अशावेळी पात्र महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. त्यामुळे तुमचं कोणतं खातं सिडिंग आहे आणि कोणत्या खात्यात पैसे जाम झालेत, हे कसं तपासायचं ते पाहुयात.