बालमनाचे भावविश्व मांडणारे बालनाट्य ‘ झाले मोकळे आभाळ ‘

परभणी,दि 01 ः
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक संचालनाच्या वतीने आयोजित 21 व्या राज्य बालनाट्य स्पर्धेत नांदेड येथे 28 जानेवारी रोजी गोपाला फाऊंडेशन परभणीच्या वतीने उत्कर्षा वाघ निर्मित डॉ सतीश साळुंके लिखित व विरेन बालाजी दामुके दिग्दर्शित ‘झाले मोकळे आभाळ ‘बालनाट्य रसिकांच्या पसंतीला उतरले.
शिक्षणासाठीची धडपड आणि कलेची आवड असणाऱ्या बहीण भावांच्या भावनांचे भावविश्व यामध्ये उत्कृष्टपणे उलगडले आहे.
ऊसतोड कामगारांच्या मुलाचे आई वडील अपघातात गेले असताना आंधळ्या मनुला गायनाची आवड तर शिक्षणाची फी भरण्यासाठी पैसे नसल्यामुळे शिक्षणापासून दूर झालेला भानू घरी बसतो. तरी मनाचा मोठेपणा दाखवत भांडी घासण्याचे काम करणारी बिरकी या मुलांना आधार देते त्याचबरोबर वर्गातील मित्र मैत्रिणी ही त्यांना मदत करतात असा भावनिक बंध उत्कृष्टरित्या या बालनाट्यातून उलगडला आहे.
यामध्ये नम्रता वाघ, पंकजा वाघ, प्रेम शिंदे, कोमल भुमरे श्रद्धा एडके, सई चिटणीस, समर्थ क्षीरसागर, यांच्या भूमिका रसिकांना भावल्या तर सोबतच मोर श्रेया पाटील , कोमल सुतारे , वैष्णवी कोंडीबा कदम, ऋतिका यादव यांनी सुंदर नृत्य केले. विषयानुरुप नेपथ्य हरिभाऊ कदम, संकेत गाडेकर, प्रकाश योजना नारायण त्यारे, राम जाधव संगीत प्रा. संजय गजमल, कुलदीप उंडाळकर, हे नाटकास वेगळी उंची प्राप्त करून देते विषयस साजेशी रंगभूषा वेशभूषा उत्कर्षा वाघ यांची होती तर किरण डाके व रमेश गायकवाड यांची रंगमंच व्यवस्था होती.तर विशेष मार्गदर्शन प्रा. सिंगापुरे सर, वडस्कर सर,याचे तर विशेष सहाय्य पवनजी निकम, संतोषजी खराटे, किशोरजी पुराणिक, प्रा. रविशंकर झिंगरे यांचे लाभले

Comments (0)
Add Comment