पुणे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेबद्दल रिल्स व व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात येत आहे. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
या योजनेत दोन कोटीहून अधिक अर्ज आले असून दीड कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये थेट जमा होत आहेत.आतापर्यंत पात हप्ते या योजनेत मिळलेले आहेत. या योजनेतील निकष बदलणार अशा बातम्या सोशल मिडीयावर पसरल्या आहेत. त्याबाबत राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या योजनेचे निकष बदलणार नाहीत. तशा पद्धतीच्या कोणतेही लेखी आदेश किंवा शासन निर्णय घेतलेला नसल्याचे महिला व बालविकास विभागाने सांगितले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाही अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे.