रंगभूमीवर सादर होणार ‘क्लीक’ माईम म्युझिकल

कला आणि वास्तव यात बारीक सीमारेषा असते ती प्रत्येक कलाकाराला ओळखता यायला हवी, कलाकार म्हणून आपण जितके प्रगल्भ आणि सुज्ञ असतो किंवा तसं भासवतो तितकेच माणूस म्हणून आपण खरंच आहोत का? असा प्रश्न प्रत्येक कलाकाराने प्रामाणिकपणे स्वतःला विचारायला हवा. अश्याच दोन फोटोग्राफर्सची (कलाकारांची ) ही कथा आहे, ते दोघेही माणसांच्या भावना कॅमेरा मध्ये कैद करतात आणि हेच त्या दोघांचं वैशिष्ट्य आहे. पण आयुष्याच्या एका टप्प्यावर दोनही फोटोग्राफर्स चा त्यांच्या कलेकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलतो भिन्न होतो, त्यांच्या या बदललेल्या दृष्टिकोणाचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि माणूस म्हणून स्वतःवर काय परिणाम होतो, हेच या नाटकातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Curtaincall production आणि Bharati आर्टस् यांनी या नाटकाची निर्मिती केलीये. सिरिअल्समधून कायम आपल्या भेटीस येणारे आयुष संजीव, पूर्वा कौशिक, अनिषा सबनीस यांबरोबरच एकूण 15 कलाकार या नाटकात काम करतायेत तर विपुल उल्हास काळे याने या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तो सांगतो की आमचं सगळ्यात पाहिलं mime आम्ही 5 मिनिटांचं केलं होतं, ते 5 मिनिटांचं mime करतानाच जाणवलं की 5 मिनिटात बांधून ठेवावा असा हा Art form नाही. जर आपण पुरेसा वेळ घेऊन mime केलं, तर सुंदर अनुभव प्रेक्षकांना देऊ शकतो. म्हणून जवळ जवळ 6 ते 7 वर्षांपूर्वी आम्ही ठरवलं होतं की असा दोन अंकी mime शो करायचा, 6 वर्षांपूर्वी ठरवलेला प्रयोग आज खऱ्या अर्थाने उभा राहिलाय.

CLICK mime musical हा नवा प्रयोग प्रेक्षकांच्याही पसंतीसही उतरलाय. एवढंच नाही तर विजय पाटकर, मुक्ता बर्वे, राजन ताम्हाणे, शलाका पवार, उमेश कामत,अविनाश नारकर, आशिष पवार, वैभव चिंचाळकर अश्या अनेक मान्यवरांनी या नाटकाचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

रंगभूमीवरील या नव्या प्रयोगाला नुकतीच त्यांच्या कामाची पोचपावतीही मिळाली. यंदाचा झी गौरव सर्वोत्कृष्ट लक्षवेधी प्रायोगिक नाटक (घोषित) हा पुरस्कार क्लिक या नाटकाला मिळाला.

या नाटकाचे निर्माते निखिल काळे असून युगांत पाटील याने नाटकाची प्रकाश योजना तर आदित्य काळे याने नाटकाचं संगीत केलं आहे.

येत्या 1 मे रोजी रात्री 8:30 वाजता श्री शिवाजी मंदिर, दादर येथे क्लिक नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. तर पाहायला विसरू नका पुरस्कार विजेता रंगभूमीवरील नवा प्रयोग “CLICK” mime musical.

ClickdadardramamimemumbaimusicalTheater
Comments (0)
Add Comment