सेलू / नारायण पाटील – येथील गीता परिवाराच्या वतीने समर्थ ऍग्रो इंडस्ट्रीज परिसरात सामूहिक राम रक्षा पठण कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते. यावेळी सेलू शहरातील विविध शाळेसह ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्रीराम कथेचे संयोजक विजयकुमार बिहाणी तर प्रमुख पाहुणे म्हणून गीता परिवार मराठवाडा प्रमुख लक्ष्मीकांत कारवा, सचिव संगीता तिवारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार सादर केले. तसेच शहरातील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांनी योगासनासह सूर्यनमस्कार सादर केले, तसेच प्रभू रामचंद्रांच्या गीतावर उत्कृष्ट नृत्य सादर केले. यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गीतापठण केले. सचितानंद डाखोरे यांच्या संचाने विविध देशभक्तीपर गीत सादर करून स्वामीजीसह उपस्थितांची दाद मिळवली. यानंतर नूतन विद्यालय, प्रिन्स इंग्लिश स्कूल, नूतन इंग्लिश स्कूल ,स्वामी विवेकानंद विद्यालय ,न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल ,शारदा विद्यालय, उत्कर्ष विद्यालय, नूतन प्राथमिक विद्यालय, पोदार इंग्लिश स्कूल, यशवंत प्राथमिक विद्यालय, न्यू हायस्कूल, केशवराज बाबासाहेब विद्यालय, नूतन कन्या प्रशाला, ज्ञानतीर्थ विद्यालय, यशवंत जिल्हा परिषद प्रशाला, व लिखित पिंपरी येथील संत तुकाराम गुरुकुल आदी विद्यालयालयातील मुला- मुलींनी सामूहिक रामरक्षा पठण करून स्वामीजीसह उपस्थितांकडून दाद मिळवली.
भारत देशावर प्रेम करा : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज
मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बालगोपाळांचे मनापासून अभिनंदन करताना, स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की ,नियमित रामरक्षाचे पठण केल्यानंतर कोणतेही संकट येणार नाही.तर आलेले संकट सहजतेने दूर होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमित रामरक्षाचे पठण करावे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दररोज स्मरण करावे .आपल्या भारत देशावर प्रेम करावे ,असे मोलाचे मार्गदर्शन स्वामीजींनी विद्यार्थ्यांना केले. ते म्हणाले की ,भारत माता की जय , लव्ह भारत असे म्हणावे. उपस्थित विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, रामरक्षा व गीता पठण, रामरक्षा व श्रीमद्भगवद्गीता पठण ,उत्कृष्टपणे सादर केले आहे .त्यामुळे त्यांच्यासह त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक वृंदांचे देखील त्यांनी अभिनंदन केले. यानंतर स्वामीजींनी सेलू शहरातील अत्रे नगर परिसरात जाऊन ह.भ.प.योगेश महाराज साळेगावकर यांच्या स्वामी गोविंददेव गिरीजी रामदासी कीर्तनकुल येथे भेट देऊन, तेथील विद्यार्थ्यांचे देखील स्वागत व मार्गदर्शन केले.