परभणी,दि 03 (प्रतिनिधी)ः
परभणी तालुक्यात जुलै २०२१मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने ११ लाख ८८ हजार रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.या नुकसान भरपाई धनादेशाचे शुक्रवार, दि़०३ डिसेंबर रोजी आ.डॉ.राहूल पाटील यांच्याहस्ते शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले़
धनादेश वितरण प्रसंगी तहसीलदार संजय बिरादार, शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, मनपा गटनेते चंदू शिंदे, नगरसेवक प्रशास ठाकूर, बाजार समिती सदस्य फैजुल्ला पठाण, प्राग़जानन काकडे, गौतम भराडे आदि उपस्थित होते़
परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये या वर्षी जुलै २०२१मध्ये जोरदार अतिवृष्टी झाली होती़ या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर आले होते़ या पुराच्या पाण्यात शेतकºयांची गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, म्हैस आदि पाळीव जनावरे वाहून गेली होती़ अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेला शेतकºयांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार डॉ.पाटील यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा केला़ या अनुषंगाने शासनाच्या वतीने परभणी तालुक्यातील लोहगाव येथील दशरथ रामा बादाड, संताबाई देविदास गमे, शिर्शी बुं़ येथील तुकाराम माणिकराव बादाड, शरद भाऊसाहेब वैद्य, संभाजी धारोजी वैद्य, भारत भाऊसाहेब वैद्य, अंकुश माधव वैद्य, दामपुरी येथील गोविंद तुकाराम बोबडे, नारायण कोंडीबा बोबडे, सिंगणापूर येथील विठ्ठल कुसूजी जमरे, शिर्शी खू़ येथील वैजनाथ रामभाऊ खरबे, नांदखेडा येथील भाऊराव रामभाऊ सावळे, वांगी येथील विठ्ठल टोपाजी शिंदे, मिरखेल येथील शोभा प्रकाश देशमुख, तट्टुजवळा येथील रंगनाथ जळबाजी गारूडे, समसापूर येथील मानिक रंगनाथ चोपडे, एकरूखा येथील प्रकाश भिमराव तायनाथ आणि इंदेवाडी येथील रंगनाथ रामकिशन कच्छवे या शेतकºयांना ११ लाख ८८ हजार रूपयांची नुकसान भरपाई शासनाकडून मंजूर करण्यात आली आहे़ या पैकी काही शेतकºयांना प्रातिनिधीक स्वरूपात धनादेशाचे वितरण आमदार डॉ.पाटील यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले़ वेळेवर नुकसान भरपाई मिळाल्याने शेतकºयांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आमदार डॉ.पाटील यांचे आभार मानले़