स्पर्धेतून विद्यार्थी घडतो – प्रा. संजय पिंपळगावकर

सेलू /प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना ,बुद्धीला चालना मिळण्यासाठी ,भाषा व सामान्य ज्ञान वृद्धिंगत होण्यासाठी स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी तयार केल्या जातो. स्पर्धा ही निकोप असते तसेच त्यातून विद्यार्थी घडत असतो असे प्रतिपादन नूतन महाविद्यालयातील प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले.राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त विवेकानंद विद्यालयात दरवर्षी आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन केल्या जाते त्या स्पर्धांच्या बक्षीस वितरण प्रसंगी संजय पिंपळगावकर बोलत होते.ते पुढे म्हणाले की संस्कृती व संस्कार हा विवेकानंद विद्यालयाचा पाया आहे ,राष्ट्रभक्तीचे धडे शाळेतून दिले जातात हेच शाळेचे गमक आहे ,त्यासाठी शिक्षकवृंद नेहमी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात असे ते म्हणाले.
प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून हरिभाऊ चौधरी ,कार्यवाह उपेंद्र बेल्लूरकर ,शालेय समिती अध्यक्षा करुणा कुलकर्णी ,सकाळचे वार्ताहर संजय मुंडे ,मुख्याध्यापक शंकर शितोळे यांची उपस्थिती होती.
इयत्ता १ते २री चित्ररंगभरण स्पर्धेत तन्वी अवचार (प्रथम ),आयशा सय्यद अली (द्वितीय),राजवर्धन जगताप (तृतीय) ,वेदिका थटवले (उत्तेजनार्थ) यांनी बक्षीस मिळवले.चित्ररंगभरण
३ ते ४थी गटात आदिती आकाशे (प्रथम),ज्ञानदा जोशी (द्वितीय),प्राप्ती चव्हाण (तृतीय),माहेश्वरी लाटे (उत्तेजनार्थ) ,पाचवी स्कॉलरशिप आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेत आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी(प्रथम),आदित्य पवन गिरी(द्वितीय),वरद राधेश्याम राठी (तृतीय),आठवी स्कॉलरशिप आधारित सामान्य ज्ञान स्पर्धेत साईराज दौंड(प्रथम),पार्थ चौधरी(प्रथम),महेक घौरी (द्वितीय),रुद्र गुंगाणे (तृतीय),दत्तप्रसाद लव्हराळे (तृतीय),अर्णव क्षीरसागर(तृतीय)
इयत्ता सहावी वर्गासाठी आयोजित निबंध स्पर्धेत पंकजा मुंढे (प्रथम),सान्वी शीतळे (द्वितीय),श्रुती उगले(तृतीय),सक्षम खंदारे (उत्तेजनार्थ)इयत्ता सातवी वर्गासाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत कल्याणी काष्टे(प्रथम),सारक्षा जगताप(द्वितीय),अंतरा टरपले(तृतीय),सिद्धी गजमल(उत्तेजनार्थ) यांनी बक्षीस मिळवले.
चित्ररंगभरण स्पर्धेचे परीक्षण सुनील मोरे व संतोष ताल्डे ,निबंध स्पर्धेचे परीक्षण दिगंबर रोकडे यांनी केले.वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण जयश्री सोन्नेकर व भाग्यश्री धामणगावकर यांनी केले. सेलू शहरातील शाळांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विजय चौधरी ,पद्य गजानन साळवे यांनी मानले .स्पर्धा प्रमुख अनिल कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Comments (0)
Add Comment