रक्तदानाचे शतक पूर्ण.. शिवलिंग बोधने यांचा जिल्हा शासकीय रक्त पेढीच्या वतीने सन्मान

परभणी,दि 28 ः प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी आज आपले १०० वे रक्तदान केले. डॉ. व्यंकटेश डुब्बेवार यांच्या पांडुरंग मल्टी स्पेशिलीटी हॉस्पिटल मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात आज शिवलिंग बोधने यांनी रक्तदान करून रक्तदानाचे आपले शतक पूर्ण केले. १९९३ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली होती व ते दर तीन महिन्याला शासकीय रक्त पेढीत जाउन रक्तदान करतात शिवाय गरवंतांना व थेलिसीमिया रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या साठी त्यांनी विविध समाजिक व राजकीय संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या मध्येमातून २५ ते ३० वेळा रक्तदान शिबीर आयोजित केले आहे त्यांच्या या कार्याबद्दल अनेकवेळा शासकीय रुग्णालय व प्रशासनाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
आज १०० वेळा रजतदान करून आपले रजतदानाचे शतक पूर्ण केल्या बद्दल शिवलिंग बोधने यांचा राज्य रक्त संक्रमण परिषदे चे सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देउन शासकीय रक्त पेढी शासकीय रुग्णालयाच्या वतीने व व्यंकटेश रुग्णालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला या वेळी व्यंकटेश रुग्णालयाचे संचालक डॉ व्यंकटेश डुब्बेवार, डॉ.व्यंकटेश हराळे, डॉ. सागर चेउलवार, डॉ. श्रुती डुब्बेवार व शासकीय रक्त पेढीचे रक्त संक्रमण अधिकारी भरोसे मॅडम, मारोती श्रीपतवार, विठ्ठल शिंदे, राजकुमार पितळे, आशाराम जाटाळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे महिला आघाडी प्रमुख माधवीताई घोडके पाटील, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, शहर चिटनीस वैभव संघई, महिला आघाडी शहर चिटनीस ऍड सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे यांच्यासह अनेक जन उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment