संविधान हाच लोकशाहीचा आत्मा-योगेश ढवारे

घर घर संविधान उपक्रम अंतर्गत शांताबाई नखाते विद्यालय येथे व्याख्यानाचे आयोजन

सेलू / प्रतिनिधी – संविधानाने सर्वांना समानतेचा दर्जा दिला असून स्वातंत्र्य, समता, बंधुता या मुल्यांवर आधारित संविधान हाच लोकशाहीचा आत्मा असल्याचे प्रतिपादन श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय येथील राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक योगेश ढवारे यांनी केले.

घर घर संविधान अमृत महोत्सवी संविधान वर्ष निमित्त श्रीमती शांताबाई नखाते विद्यालय येथे संविधान आज काल व उद्या या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते.

 

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक प्रल्हाद शहारे, केशवराज बाबासाहेब विद्यालयातील सहशिक्षक नामदेव क्षीरसागर आदिची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी संविधान समिती मधील सर्व सदस्यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी योगेश ढवारे यांनी संविधान मूलभूत हक्क व कर्तव्य, सद्यस्थितीत हक्क व मुलभूत जबाबदारी या विषयी सखोल मार्गदर्शन केले तसेच संविधान निर्मिती प्रक्रिया या विषयी माहिती दिली. संविधान निर्मिती पार्श्वभूमी, टप्पे, आलेल्या अडचणी यावर प्रकाश टाकला.

 

संविधानाच्या उद्देशीकेचे वाचन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली

सूत्रसंचालन शिवप्रसाद आहेर यांनी केले तर आभार उमाकांत बरकुले यांनी मानले.कार्यक्रमास पाचवी ते दहावी चे जवळपास 500 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Comments (0)
Add Comment