सेलू / प्रतिनिधी – तालुक्यातील सर्व वाळू ठेके बंद असतांना देखील रात्रंदिवस अवैधरीत्या होत असलेला वाळू उपसा त्वरित बंद करावा व शासनाचा करोडो रुपयाचा महसूल बुडणार नाही याची दखल घ्यावी . तसेच तालुक्यातील वाळू माफिया व गुटका माफियावर योग्य ती कार्यवाही करावीअशी मागणी किशोर मुक्तावार व सुनील चव्हाण यांनी केली आहे .
याबाबत त्वरित कार्यवाही करावी यासाठी २१/२/२४ रोजी सेलू पोलीस स्टेशन परिसरात किशोर मुक्तावार व सुनील चव्हाण यांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले .व याबाबत त्वरित योग्य ती कार्यवाही न झाल्यास २८ फेब्रुवारी रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे .