निपाणी टाकळी ते उपजिल्हारुग्णालय मार्गे सेलू रस्त्याची दुरुस्तीची मागणी

सेलू / नारायन पाटील – निपाणी टाकळी ते उपजिल्हारुग्णालय मार्गे सेलू हा रस्ता केवळ ३ किमी चा असून निपाणी टाकळी ते फिल्टर मार्गे सेलू हा रस्ता ८ किमी चा आहे .दोन्ही मार्गात ५ किमी चा फरक आहे .

३ किमी असलेला मार्ग अधिक सुकर असतांना देखील केवळ रस्ता दुरुस्त नसल्यामुळे नाईलाजासत्व ८ किमी असलेल्या मार्गाने सेलूकरांना प्रवास करावा लागतो.
महत्वाचं म्हणजे या ३ किमी असलेल्या मार्गावर टाकळी ते सेलू मार्गावर शासकीय उपजिल्हा रुग्णालय व शारदा विद्यालय ही शैक्षणिक संस्था आहे .

उपजिल्हारुग्णालयातील गंभीर रुग्णाला पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्याची सेलू शहराला वळसा घालून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत नाविलासत्व ८ किमी लांबीच्या असलेल्या मार्गाने जावे लागते यात अनेकदा रुग्णाला आपला जीव देखील गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही .

 

या जवळच्या ३ किमी असलेल्या मार्गाचे निम्मे काम पूर्ण झाले असून केवळ १.५ किमी मार्गाचे काम शिल्लक आहे.
तरी या रोडला अच्छे दिन कब आयेगें? हा प्रश्न जनतेमधून व रुग्णाच्या नातेवाईकाकडून उपस्थित केला जात आहे .

गंभीर रुग्णाचे प्राण आणि सामान्य प्रवाशांचे हाल थांबवायचे असतील तर लवकरात लवकर हा मार्ग पूर्ण करून प्रशासन लावलेल्या रंगीत पाटी प्रमाणे मार्ग चकाचक करेल अशी जनतेमधून माफक अपेक्षा व्यक्त होत आहे .
याबाबत वेळोवेळी निवेदनाद्वारे मागणी केली गेलेली आहे .परंतु या कामासाठी आडकाठी आणणारा झारीतील शुक्राचार्य कोण हे समजत नाही .परंतु यामुळे प्रवाशी व रुग्णांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .

Comments (0)
Add Comment