चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्यास तात्काळ अटक करून फाशी देण्याची मागणी

पाथरी प्रतिनिधी
सोनपेठ येथील साडेचार वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास तात्काळ अटक करून जलद न्यायालयात प्रकरण चालवून फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी ग्लोबल कहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
तहसिलदार यांच्या वतीने मुख्यमंत्री गृहमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात बदलापुरला लाजवेल अशी घटना सोनपेठ येथे घडली.
एल आर के इंग्लिश स्कूल विद्यालय सोनपेठ बालवाडीत शिकणा-या साडेचार वर्षीय मुलीवर शाळेतील स्वच्छता गृहात शाळेतीलच शिक्षक आरोपीने अत्याचार केल्याचे या पिडीत मुलीने सांगुन सुध्दा आरोपी मोकाटच आहे यामुळे पोलीसांची
भुमिका संशयास्पद दिसुन येत आहे या आरोपीस राजकीय पाठबळ मिळत आहे केवळ माजी आमदार पुतण्याचा शाळेत घडलेली घृणास्पद घटना आहे मनोविकृत आशा आरोपीना संस्थाचालक वाचवित आसल्याचे स्पष्ट दिसुन येत आहे. एल आर के इंग्लिश स्कूल बालवाडीत शिकणा-या चिमरडीवर आत्याचार करणा-या नराधम तातडीने अटक करून जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून नराधमास फाशीची शिक्षा मिळेल अशी कायदेशीर कार्यवाही करावी अन्यथा 14/10/2024 सोमवारी रोजी कहार, भोई, भिल्ल भोई मच्छीमार समाजाच्या वतीने महाराष्ट्रात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा कहार समाज संघटनेचा संघटना सह समाज बांधवाचा वतीने देण्यात आला आहे.या निवेदनावर मच्छिंद्र गहिरे ,दत्ता बिजुले ,रमेश बिजुले, संतोष कुलभैया ,राजेभाऊ लिंबोरे ,अशोक लिंबोरे, बाळासाहेब गहिरे, लालचंद गहिरे ,तुकाराम कांबळे, गोपीनाथ घुगोस यांच्यासह शेकडो भोई समाजाच्या स्वाक्षऱ्या आहेत

Comments (0)
Add Comment